नवी दिल्ली (हिं.स.) : कोरोना साथरोगाच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन रेल्वेने प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. रेल्वेचे कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी यासंदर्भात ९ मे रोजी परिपत्रक जारी केलेय.
नीरज शर्मा यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, प्रवाशांना मास्क घातल्यानंतरच स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. त्यशिवाय ट्रेनमधून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत झालेली घट लक्षात घेता इतर गोष्टींप्रमाणे रेल्वेची सेवादेखील पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती.
तसेच अनेक निर्बंधदेखील रेल्वेतर्फे शिथील करण्यात आले होते. त्यानंतर अनेकांनी मास्कसक्ती नसल्याने प्रवासादरम्यान मास्क परिधान करणे बंद केले होते. मात्र, आता पुन्हा देशातील काही भागात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहे. तसेच आगामी काळात कोरोनोची चौथी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
त्यापार्श्वभूमीवर आता रेल्वेने पुन्हा स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांना आणि ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…