कल्याण (प्रतिनिधी) : प्रवाशाच्या हातावर काठीचा फटका मारून मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला अटक करण्याची कारवाई कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केली आहे. मगंळवारी सायंकाळी ७ च्या सुमारास गोदावरी एक्स्प्रेसच्या फुटबोर्डवर बसून १९ वर्षीय सोमनाथ धोत्रे हा विद्यार्थी कर्जत ते इगतपुरी प्रवास करत करीत होता. गाडी कर्जत स्टेशन मधून मार्गस्थ होताच सोमनाथ दरवाज्यात उभा राहून फोन वर बोलत असताना ट्रॅकच्या शेजारी हातात काठी घेऊन उभ्या असलेल्या गोरख याने त्याच्या हातावर फटका मारला हा फटका मोबाईलवर बसल्याने या विद्यार्थ्याच्या हातातून मोबाईल खाली पडताच गोरख याने हा मोबाईल उचलून पळ काढला.
ही घटना प्रवाश्यानी पाहत आरडाओरडा सुरू केला त्यावेळी त्या परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी तत्काळ या चोराचा पाठला केला असता चोरट्याने पोलिसाला काठीचा धाक दाखवून पळून जाण्याच्या प्रयत्नात केला मात्र लोहमार्ग पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्याला पकडले. व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चोरलेला मोबाइल मिळाल्याने लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या वर गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या.
लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विविध पोलिस स्थानकात याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…