६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच


पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचे आयोजन २२ एप्रिल रोजी म्हाडा येथील गुरुकुल शाळेच्या सभागृहात प्रांताधिकारी प्रवीणवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी काही ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत चिट्ट्या उडवून शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. यामध्ये गागोदे खुर्द ही एकमेव ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आली असून, १४ ग्रामपंचायतींमध्ये आदिवासी समाजाचे सरपंच विराजमान होणार आहेत.


महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका काही महिने लांबणीवर गेल्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून कारभार सुरू ठेवण्यात आला होता. मात्र आता सरपंच आरक्षण सोडत होत असल्याने लवकरच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या पेण तालुक्यातील ६४ सरपंच पदांच्या आरक्षण सोडतीत गागोदे खुर्द ही एक ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आली.


कळवे, मसद बुद्रुक, सोनखार, आमटेम, हमरापूर, अंतोरे, जिर्णे या सात अनुसूचित जमाती महिला सरपंच पदाकरीता असून, तर काळेश्री, कणे, दूरशेत, वढाव, वाशी, जीते, जोहे या खुला प्रवर्ग असे एकूण १४ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये महिला आरक्षित शिर्की, रावे, वरेडी, कांदळे, मळेघर, रोडे, झोतीरपाडा, वरवणे, निधवली या नऊ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव असून, यात खुल्या प्रवर्गासाठी दिव, कासू, खरोशी, वडखळ, बेणसे, कुहिरे, आंबेघर, शेडाशी या आठ ग्रामपंचायती अशा एकूण १७ ग्रामपंचायती आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, तर सर्वसाधारण सरपंच पदाकरिता महिला खारपाले, डोलवी, कोलेटी, पाटणोली, कोप्रोली, उंबर्डे, शिहू, बेलवडे बुद्रुक, कामार्ली, जावळी, सावरसई, वाक्रुळ, महलमिऱ्या डोंगर, करोटी, वाशीविली, वरप या सोहा जागा ठेवण्यात आल्या असून, यामध्ये सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी बोर्झे, दादर, कोपर, बोरी, काराव, मुंढाणी, आंबिवली, निगडे, दुश्मी, बळवली, तरणखोप, वरसई, बोरगाव, करंबेली छत्तीशी, पाबळ, सापोली या सोळा जागा ठेवण्यात आले आहेत. सोडतीवेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद काळेकर, नायब तहसीलदार नितीन परदेशी, लिपिक नरेश पवार, पंजाब राठोड आदींसह महसूल कर्मचारी तसेच तालुक्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, नागरिक, राजकीय पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.




  • अनुसूचित जाती आरक्षित जागा – १

  • अनुसूचित जमाती आरक्षित जागा - महिला ७, खुला ७, एकूण - १४

  • ना. मा. प्र. आरक्षित जागा - महिला ९, खुला ८, एकूण- १७

  • सर्वसाधारण आरक्षित जागा - महिला १६, खुला १६, एकूण- ३२

  • पेणमधील एकूण ग्रामपंचायत – ६४

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी

सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव काय आहे?

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून आली आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला

Nashik Simhastha Kumbh Mela : गणेशोत्सव २०२६ ठरणार महासिंहस्थ जनजागृतीचे व्यासपीठ, कुंभमेळा प्राधिकरणाकडून ‘गणेश मंडळ स्पर्धेचा' प्रस्ताव

Nashik Simhastha KumbhMela : महासिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची तयारी वेग घेत असताना, गणेशोत्सवाच्या माध्यमातून महासिंहस्थचा संदेश

Healthy Sweet Dish : सणासुदीला गोड खा, पण वजन वाढण्याची चिंता नको! ‘हे’ हेल्दी स्वीट्स नक्की ट्राय करा

मुंबई : सणासुदीचे दिवस म्हटले की घरात गोड पदार्थांची रेलचेल सुरू होते. लाडू, बर्फी, श्रीखंड, मोदक अशा पदार्थांवर