मुंबई (प्रतिनिधी) : ‘‘स्वातंत्र्याची कल्पना भारतात स्त्री समानतेशी जोडलेली आहे. आझादी किंवा स्वातंत्र्य या शब्दाचा महिलांसाठी व्यापक सूचक अर्थ ठरावीक चौकट, निषिद्ध गोष्टींविरोधातील लढा असा आहे.” असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नेटफ्लिक्सच्या सहकार्याने तयार केलेली ‘आझादी की अमृत कहानियाँ’ ही एक छोटी व्हीडिओ मालिका सुरू केली.
‘आझादी की अमृत कहानी’ हा एक अनोखा उपक्रम आहे. जो महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि शाश्वतता आणि इतर घटकांसह विविध संकल्पनांवर प्रेरणादायी भारतीयांच्या सुंदर कथा सादर करतो. वैविध्यपूर्ण कथांचा हा संच देशाच्या कानाकोपऱ्यांतील भारतीयांना प्रेरित आणि सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो.
मंत्रालय आणि नेटफ्लिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडिओंचा पहिला संच तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये देशभरात बदल घडवून आणणाऱ्या सात महिला आहेत, ज्यांनी चाकोरीबाहेर पडण्याचे आपले अनुभव सामायिक केले आहेत. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे काय हे सांगताना त्यांनी त्यांचे वर्णन ‘निसर्गाची शक्ती’ म्हणून केले आहे. भारतातील विविधतेचे अनोखे दर्शन घडवणाऱ्या दोन मिनिटांच्या या लघुपटांचे चित्रीकरण देशभरातील विविध ठिकाणी करण्यात आले आहे आणि प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी निवेदन केले आहे.
बदल घडवणाऱ्या पहिल्या संचातील सात महिला पुढीलप्रमाणे – बसंती देवी, (पद्म पुरस्कार विजेत्या पिथौरागढ येथील पर्यावरणवादी आहेत (ज्या कोसी नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ओळखल्या जातात), अंशु जमसेनपा (२०१७ मध्ये पाच दिवसांमध्ये दोन वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील पहिली महिला म्हणून गौरवण्यात आलेली पद्मश्री पुरस्कार विजेती), हर्षिनी कान्हेकर (भारतातील अग्निशमन दलातील पहिल्या महिला कर्मचारी) यादेखील या प्रकाशनाला उपस्थित होत्या.
पूनम नौटियाल (एक आरोग्य सेवा कर्मचारी असून उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात सर्वांचे लसीकरण करण्यासाठी मैलोनमैल चालत गेल्या आहेत), डॉ. टेसी थॉमस (भारतातील क्षेपणास्त्र प्रकल्पाचे नेतृत्व करणारी पहिली महिला वैज्ञानिक), तन्वी जगदीश (भारतातील पहिली स्टँड-अप पॅडलबोर्डर स्पर्धक महिला) आणि आरोही पंडित, (लाइट स्पोर्ट विमानातून अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागर एकटीने ओलांडणारी जगातील सर्वात तरुण आणि पहिली महिला वैमानिक), बसंती देवी (अंशू आणि हर्षिनी यांचे तीन व्हीडिओ आणि मालिकेचे संक्षिप्त दर्शन घडवणारा ट्रेलर आज प्रकाशित करण्यात आला. केंद्रीय मंत्र्यांनी व्यासपीठावर उपस्थित या तिन्ही महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा केली आणि त्यांच्या कथा देशभरातील लोकांना प्रेरणा देतील, असे सांगितले.