Friday, May 9, 2025

अध्यात्म

श्रीस्वामी अमेरिकेत प्रकटले

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामघोषाचा गजर आता अमेरिकेतही दुमदुमत आहे. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून शिकागो येथील कालीबारी मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या मूर्तीची नुकतीच (३ एप्रिल) प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अमेरिकेत स्वामी समर्थांची ही पहिली मूर्ती आहे.


अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे ज्या वटवृक्षाखाली जवळजवळ २२ वर्षं वास्तव्य होते त्या वटवृक्षाच्या खोडांपासून बनवलेल्या पादुकांची देखील कालीबारी मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी शिकागोच्या कालीबारी मंदिरात खास कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री गायिका डॉ. पद्मजा फेणाणी - जोगळेकर यांच्या सुमधुर आवाजानं झाली. पद्मजा ताई यांनी श्री समर्थ तारकमंत्र आणि इतर स्वामी भजनांची ऑनलाइन माध्यमातून स्वामींच्या चरणी स्वरपुष्पे वाहिली. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे आणि पादुकांचे स्वागत मंदिरातील कलाशारोहण समारंभाने केली. त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीचा अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ४१ कुटुंबांनी स्वामींच्या छोट्या ४१ मूर्तींवर अभिषेक केला.


कालीमाता हे आराध्य दैवत असलेल्या शिकागोच्या कालीबारी मंदिरामध्ये गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या मूर्ती देखील स्थापित आहेत. त्याबरोबर आता स्वामी समर्थांची मूर्ती देखील स्थापित झाल्यानं भक्तांसाठी तिन्ही गुरूंच्या मूर्ती एकत्र असल्याचा दुर्मीळ योग जुळला आहे. या कार्यक्रमाला अमेरिकेतील वेगवेगळ्या भागातून स्वाभिभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ढोल-ताशा आणि पालखीच्या गजरांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणूक सोहळा पार पडल. महाआरतीनं या कार्यक्रमाची सांगता झाली.


स्वामी माझे महाकृपाळू
स्वामी माझे महादयाळू ।। १।।
जेथे जेथे जे जे कमी
तेथे उभे राहती स्वामी ।। २।।
प्रकटदिनी हजर स्वामी
देवळा देवळात स्वामी ।। ३।।
घराघरात स्वामी
मना मनात स्वामी ।। ४।।
काश्मीर ते कन्याकुमारी
स्वामी फिरती जगभर ।। ५।।
गिरगांव ते गोरेगाव
अक्कलकोट ते गुरगांव ।। ६।।
प्रत्येक प्रसन्न गाव
स्वामीचे गुण गाव ।। ७।।
डोंबिवलीचे झाले कल्याण
उल्हासनगरचे स्वामींमुळे कल्याण ।। ८।।
हिमालय नेपाळात
पोहोचले स्वामी
अमेरिकेतही प्रकटले स्वामी ।। ९।।
स्वामी प्रकट दिनी


विलास खानोलकर [email protected]

Comments
Add Comment