‘हुनर हाट’चे आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : देशाच्या प्रत्येक भागात 'स्वदेशी' आणि 'व्होकल फॉर लोकल' च्या व्यापक सामर्थ्याचा अनुभव देणाऱ्या, कौशल्य कुबेरांच्या 'हुनर हाट' प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (१७ एप्रिल) सकाळी ११.३० वा. होणार आहे. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी ही माहिती दिली.


'हुनर हाट' हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि 'स्वदेशीतून स्वावलंबन' या संकल्पनांचा सशक्त, प्रभावी प्रकल्प म्हणून सिद्ध होतो आहे, असे नक्वी यांनी सांगितले.


४०वा 'हुनर हाट' प्रदर्शनाला शनिवारपासून वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) सुरुवात झाली आहे. २७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात ‘हुनर हाट’ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, नागालँड, मध्य प्रदेश, मणिपूर, बिहार, आंध्र प्रदेश, झारखंड, गोवा, पंजाब, लडाख, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळसह देशातील प्रत्येक क्षेत्रांतून नावाजलेले कारागीर हस्तनिर्मित दुर्मिळ स्वदेशी उत्पादने घेऊन सहभागी झालेले आहेत.


‘हुनर हाट’च्या उपहारगृहात (फूड कोर्ट) इथे येणारे लोक देशाच्या विविध भागांतील पारंपरिक पदार्थांचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘विश्वकर्मा वाटिका’, दररोज होणारे सर्कशीचे खेळ, ‘महाभारता’चे सादरीकरण, प्रसिद्ध कलावंतांच्या गीत-संगीताचे कार्यक्रम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पॅव्हेलीयन, सेल्फी पॉइंट इत्यादी, मुंबई इथे आयोजित ‘हुनर हाट’ चे मुख्य आकर्षण आहेत.


१२ दिवस चालणाऱ्या मुंबई ‘हुनर हाट’ मध्ये येणाऱ्या लोकांना प्रसिद्ध कलाकारांच्या विविध गीत - संगीताच्या भव्य कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.

Comments
Add Comment

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी