Friday, May 9, 2025

अध्यात्ममहत्वाची बातमी

आश्रम समिती

आश्रम समिती

श्री भालचंद्र महाराजांच्या महान तपश्चर्येची ख्याती सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे हा हा म्हणता समाजात पसरली. तेव्हा त्यांच्या नुसत्या दर्शनाला महाराष्ट्रातून भाविक भक्तांचा अमर्याद लोंढा येऊ लागला. एकमेकांचे अनुकरण करून कोणी कोणी श्रीबाबांसमोर पैसे ठेवू लागले. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या तत्त्वानुसार हळूहळू निधी जमा होऊ लागला; परंतु बाबांना त्यांचे काय? ‘तुका म्हणे धन आम्हा मृत्तिके समान.’ मात्र श्रीबाबांसमवेत कायम घोळका करून बसणाऱ्यांचे फावले होते. भाविक भक्त आपला पैसा देण्याचा धर्म सोडत नव्हते. असे होता होता हजारो रुपये जमू लागले. अशा सत्पुरुषाच्या नावावर जमा झालेल्या निधीचा योग्य विनिमय व्हावा, बुवाबाजीचा गोंधळ टाळावा, भाविकांचा आत्मविश्वास वाढावा या सद्हेतूने मुक्काम कणकवलीतील काही विचारवंतांनी ‘श्री भालचंद्र महाराज आश्रम कमेटी’ नावाची संस्था स्थापून ती रजिस्टर करून घेतली. श्री भालचंद्र महाराज आश्रम कमेटीने ‘जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे’ या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे श्रीबाबांच्या भाविक भक्तांनी दिलेल्या देणग्यांचा योग्य उपयोग करून सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक कार्य हाती घेतले. ही फार आनंदाची गोष्ट आहे.


(क्रमश:)


- राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!

Comments
Add Comment