सामाजिक ऐक्याला धक्का लावण्याचा प्रयत्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील सामाजिक ऐक्याला धक्का लावण्याचा प्रयत्न होत आहे. सांप्रदायिक विचारांची मांडणी काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. लोकांनी याला बळी पडू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्य सरकार गंभीरतेने विचार करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


राज ठाकरे यांच्या मंगळवारच्या भाषणात भारतीय जनता पक्षाबद्दल एकही शब्द आलेला नाही. त्यांच्यावर भाजपने कदाचित काही जबाबदारी दिलेली असावी त्याचा प्रत्यय कालच्या सभेत आला. महागाई, बेरोजगारी एवढी वाढलेली असताना जर एखादा राजकीय नेता आपल्या सभेत त्यावर एक शब्दही बोलत नाही, म्हणजे काय समजायचं? असा सवाल त्यांनी केला. मला नास्तिक म्हणता, परंतु मी तुमच्यासारखे देवधर्माचे प्रदर्शन  कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणुकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा... एकच ठिकाण आहे... एकच मंदिर आहे. त्याचा आम्ही गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे.


प्रबोधनकारांनी देवधर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर सडकून टिका केली. गैरफायदा घेणाऱ्याला ठोकून काढण्याचे काम केले. आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो. मात्र कुटुंबातील वाचतात असे नसावे असा टोला त्यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांचे मी नाव घेत नाही, असा उल्लेख ठाकरे यांनी केला. पण अमरावतीत केलेले माझे भाषण ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर जवळपास २५ मिनिटे बोललो. फुले-शाहू-आंबेडकरांबाबतही उल्लेख केला जातो त्याचा मला अभिमान आहे. या तिघांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे आहे असेही पवार म्हणाले.


पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करत असताना माँ जिजाऊंनी  छत्रपतींचे व्यक्तिमत्व घडवले असे सांगण्याऐवजी दादोजी कोंडदेव यांनी ते घडविले असा उल्लेख केला होता. त्याला माझा सक्त विरोध होता, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

Snehal Jadhav : मुंबईत 'मनसे'ला मोठा धक्का; स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण

पश्चिम रेल्वेचे प्रवासी-केंद्रित विकासाचे ऐतिहासिक वर्ष

२०२५ मुंबई : २०२५ हे वर्ष पश्चिम रेल्वेसाठी एक ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी वर्ष म्हणून उदयास आले. हे वर्ष

राष्ट्रपतींचा 'आयएनएस वाघशीर'मधून प्रवास

मुंबई : भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी अरबी

पश्चिम रेल्वेवर आजपासून विविध मार्गांवर रेल्वे ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी १८ जानेवारी २०२६

आरे ते कफ परेड मेट्रो रात्रभर धावणार

बुधवारी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी