ऑस्कर पुरस्कार २०२२ : म्हणून विल स्मिथने क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली

नवी दिल्ली : यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान एक विचित्र घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ याने स्टेजवर जाऊन सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.



नेमक काय घडलं?


सुत्रसंचालन करणारा क्रिस रॉक स्टेजवर डॉक्यूमेंटरी फीचरसाठी ऑस्कर पुरस्कार जाहीर करण्यासाठी आला होता. याच दरम्यान रॉकने विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ हिच्या केसांबद्दल खिल्ली उडवली. यामुळे स्मिथला प्रचंड राग आला आणि तो थेट स्टेजवर गेला आणि क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. तसेच विल स्मिथने तू माझ्या पत्नीचे नाव तुझ्या तोंडून पुन्हा घेऊ नकोस, असा इशाराही दिला.


विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ ही आलोपेसिऍ (Alopecia) नावाच्या आजाराने त्रस्त असून या आजारामुळे डोक्यावर टक्कल पडते. त्यामुळे तिच्या डोक्यावर केस नाहीत. अशा परिस्थितीत क्रिस रॉकने जॅडा स्मिथच्या केसांबद्दल खिल्ली उडवल्याने ते स्मिथला अजिबात आवडले नाही. विल स्मिथला प्रचंड राग आला आणि स्मिथ थेट स्टेजवर गेला आणि क्रिस रॉकच्या कानाखाली जाळ काढला.

Comments
Add Comment

इराणचा सौदीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला, जगाची वाढली चिंता

तेहरान : अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण अशी लढाई सुरू झाल्यामुळे आखाती देशांमध्ये अस्थिरतेचे आणि

US fighter jet : अमेरिकेचं लढाऊ विमान कुवेतमध्ये कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल

सोमवार २ मार्च २०२६ रोजी कुवेतमध्ये अमेरिकेचे एफ-१५ (F-15) लढाऊ विमान कोसळल्याचा आणि आगीच्या गोळ्यात रूपांतर

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आणि आता तालिबानने नूर खान एअरबेसवर केला हल्ला

रावळपिंडी : ऑपरेशन सिंदूरमध्ये (२०२५) भारताने आणि आता अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबानने (२०२६)

Mumbai Airport: परदेशी प्रवास ठप्प; मुंबई विमानतळावरील १२५ विमानांची उड्डाणं रद्द

मुंबई: मध्यपूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबईतील

Israel - Iran War : तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात ? अतिरेकी संघटना 'हिजबुल्लाह'चा इस्रायलवर रात्रभर हल्ला

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Jammu And Kashmir News : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये पाकिस्तानी ड्रोन; भारतीय सैन्याकडून गोळीबार होताच पळाले

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान सीमाभागात पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा वाढू लागल्या आहेत. एकीकडे