परिवहन मंत्र्यांच्या अल्टिमेटमनंतरही एसटी कर्मचारी संपावर कायम

मुंबई : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या चार महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. तर १० मार्च पर्यंत कामावर राहण्याचं अल्टिमेटम राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना दिला होता. मात्र अजूनही कर्मचारी संपावर ठाम आहेत.


एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी १० मार्चपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा अल्टिमेटम राज्याचे अनिल परब यांनी दिला होता. या मुदतीपर्यंत हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात येईल, अशी ग्वाही परब यांनी दिली होती. मात्र, १० मार्चपर्यंत रुजू झाले नाहीत तर नोकरी कायमची गमवावी लागेल, असा इशाराही दिला होता. मात्र त्यांच्या याच अल्टीमेटमनंतरही कर्मचारी संपावर कायम असल्याचे समोर आले आहे.


एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान अनेक संघटनेच्या लोकांनी माघार घेतली. त्यानंतर सरकारकडून पगारवाढीची घोषणा झाली, त्यानंतर आता सातवा वेतन आयोग देण्यात येईल, अशी चर्चा सुरु आहे. मात्र असे असले तरीही शासनात विलीनीकरण ही कर्मचाऱ्यांची एकच मागणी असल्याचे अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 'सहासूत्री' कार्यक्रम; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

राज्यात १ जानेवारीपासून प्रशिक्षणाची दुसरी बॅच; १ लाख १० हजार तरुणांचे प्रशिक्षण पूर्ण नागपूर : राज्यात सुरू

तिरुवनंतपुरममध्ये एनडीएने इतिहास रचला, केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यूडीएफचा विजय

तिरुवनंतपुरम : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने शनिवारी तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये इतिहास रचला, जिथे त्यांनी

मुंबईत फुटबॉल स्टार मेस्सी येणार, वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

मुंबई : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला आहे. शनिवारी मेस्सी कोलकाता येथे होता.

नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावणार, तीन मोठ्या नक्षलवाद्यांची शरणागती

गोंदिया : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना शरण या नाही तर मरा असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. अमित

मुंबईत रोहिंग्यांविरोधात 'कोम्बिंग ऑपरेशन'; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत घोषणा

नागपूर : मुंबईतील जमिनींवर भूमाफियांच्या मदतीने रोहिंग्या मुसलमानांचे बेकायदेशीर वास्तव्य आणि बांधकामे वाढत

“राष्ट्रप्रेम, सेवा आणि संघटनशक्तीचा संगम म्हणजे रेशीमबाग”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी दिली नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ