Wednesday, April 30, 2025

देशमहत्वाची बातमी

पंजाबमध्ये 'आप'चे वर्चस्व

अमृतसर : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येणार हे आता स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाने राज्यातील सत्ताधारी काँग्रेससह अकाली दल आणि भाजपला जोरदार धक्का दिल्याचे चित्र दिसत आहे.

गेली दीड वर्ष पंजाब शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत होते. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मात्र पंजाबच्या मतदारांनी सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. येथे 'आप'ने मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस फक्त १३ जागांवर आघाडीवर आहे. अकाली दल आणि भाजप यांना दुहेरी संख्या अद्याप गाठता आलेली नाही.

राज्यातील दिग्गज नेते पिछाडीवर असून यात मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंह, नवज्योत सिंह सिद्धू आणि सुखबीर सिंह बादल यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह पटियाळा शहरातून १० हजार मतांनी पिछाडीवर आहेत. या ठिकाणी आपचे अजीत पाल सिंग कोहली यांनी आघाडी घेतली आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह भदौड आणि चमकौर साहिब या दोन्ही मतदार संघातून पिछाडीवर आहेत. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री देखील पिछडीवर आहेत. अमृतसर ईस्ट विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे नवज्योत सिंह सिद्धू तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Comments
Add Comment