मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागण्यासाठी मुंबईसह राज्यात काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत असताना लोकांची मोठी गैरसोय होते. म्हणूनच हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
“महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांच्या विचारांचा अपमान नरेंद्र मोदींनी केला असून भाजपाने त्यांना पाठिंबा दिला असून आम्ही त्याचा निषेध करतो. भाजपानेच लोकांना रस्त्यावर आणले असून भाडोत्री लोकं उतरवली आहेत. त्यांनीच रस्ता जाम केला. ही महाराष्ट्रद्रोही भाजपा असल्याचं यानिमित्ताने स्पष्ट झालं आहे. त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागत आहे. आजचं आंदोलन आम्ही तात्पुरतं मागे घेत आहोत. पण हे आंदोलन सर्व खासदारांच्या घरासमोर सुरु ठेवण्याची भूमिका स्पष्ट आहे,” असं नाना पटोले म्हणाले. आंदोलनाची पुढील तारीख आम्ही सांगू असंही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “आमचं आंदोलन झालं आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पण भाजपाच्या लोकांनी आज मुंबईकरांना अडवलं. आम्हालाही गुंडगिरी करता येते, पण ही आमची संस्कृती नाही”.
“भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाऱाष्ट्राला दाखवला आहे. मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल, राज्यातील सर्व संपत्ती विकून गुजरातला नेली तरी चालेल पण आम्ही मोदींचं समर्थन करुन अशी भाजपाची वृत्ती आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. आम्ही आंदोलन मागे घेतलं नसून लोकांची गैरसोय म्हणून ते तात्पुरतं स्थगित केलं आहे असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…