चीनमध्ये 'गोल्ड एटीएम'चा धुमाकूळ; आता एटीएमद्वारे सोने द्या, पैसे घ्या!

शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान समोर आलं आहे 'गोल्ड एटीएम'. Gold ATM हे एटीएम म्हणजे फक्त पैसे काढण्यासाठीच नव्हे, तर थेट सोनं विकण्यासाठीही वापरलं जातंय. विशेष म्हणजे, या यंत्रात दागिने टाकले की ते आपोआप शुद्धता तपासते, वितळवते, वजन करते आणि बाजारातील चालू भावानुसार त्याची किंमत ठरवते. अवघ्या २० मिनिटांत व्यवहार पूर्ण होतो आणि नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात.


शांघायच्या सर्वांत गजबजलेल्या मॉलमधील Gold ATM या यंत्राने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे मशीन वापरण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यंत्राद्वारे फक्त ३ ग्रॅमपेक्षा जास्त आणि ५० टक्क्यांपेक्षा अधिक शुद्धतेचं सोनेच स्वीकारलं जातं. त्यामुळे अनेकजण आपलं वारसाहक्काचं किंवा जुने दागिने घेऊन येत आहेत. गर्दी इतकी वाढली आहे की मॉलच्या वेळेनंतरही कर्मचार्‍यांना थांबून मदत करावी लागत आहे.



Gold ATM यंत्र बसवणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनुसार, जवळपास ७० टक्के वापरकर्ते या एटीएममध्ये आपले जुने दागिने विकणाऱ्या वयस्क महिलाच आहेत. या महिला खास करून दिवसाच्या वेळात येतात आणि जुन्या स्टाईलचे नेकलेस, बांगड्या इत्यादी विकतात. एका डेमोमध्ये ४० ग्रॅमच्या नेकलेससाठी एका ग्रॅमला ७८५ युआन म्हणजे जवळपास ९,२०० रुपये मिळाले. काही मिनिटांतच ३६,००० युआन म्हणजे जवळपास ४.२ लाख रुपये एटीएममध्ये जमा झाले.


Gold ATM या एटीएमचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पारदर्शकता. दुकानांमध्ये सोन्याच्या शुद्धतेबाबत शंका असते, किंमत कळत नाही. मात्र या यंत्रामुळे व्यवहारात कोणताही फसवणुकीचा धोका नाही. त्यामुळेच शांघायमधील नागरिक याकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत.





‘सिक्स्थ टोन’ या मासिकाच्या माहितीनुसार, चीनमध्ये अशा प्रकारची मशीन जवळपास १०० शहरांमध्ये मॉल्स, बँका आणि ऑफिस इमारतींमध्ये बसवण्यात आली आहेत. लवकरच शांघायमध्ये याच पद्धतीच्या आणखी Gold ATM यंत्रांची स्थापना होणार आहे, कारण लोकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.


सोन्याच्या Gold ATM या तांत्रिक क्रांतीमुळे सोशल मीडियावरही उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणी म्हणतं, “यामुळे डॉलरचं साम्राज्यच कोसळेल,” तर काही जण म्हणतात, “चीन जगापुढे तंत्रज्ञानात किती पुढे आहे, याचा हा पुरावा आहे.”


सध्या संपूर्ण जगभरात सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या असून, भारतासारख्या मोठ्या बाजारातही गुंतवणुकीची आणि विक्रीची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या या Gold ATM यंत्राने जगभरात खळबळ माजवली असून, भविष्यात अशीच सोने विक्री करणारी एटीएम यंत्रणा इतर देशांमध्येही पाहायला मिळेल, यात शंका नाही.

Comments
Add Comment

Colombia Earthquake : कोलंबियाला भूकंपाचा भीषण धक्का! ७.४ रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या

Russian cosmonaut : रशियन अंतराळवीरांकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या विशेष शुभेच्छा

नवी दिल्ली : भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील रशियन

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख

Iran-US tensions : जमिनीवरील हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा, ट्रम्प यांच्या माघारीच्या प्रयत्नांना खीळ  

इराण आणि अमेरिका यांच्यातील भू-राजकीय तणाव दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अमेरिकेचे लष्कर इराणी भूमीवर

Mumbai Terror Attack : २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल अजीजचा संशयास्पद मृत्यू; मशिदीच्या गेटवर अचानक कोसळला, विषप्रयोगाची शक्यता?

- इस्लामाबादमध्ये अनोळखी ठिकाणी जेवण केल्यानंतर काही वेळातच मृत्यू इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी

Russia-India Trade : भारतासाठी रशियाची मोठी योजना; हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा विचार

मुंबई : भारत आणि रशियामधील व्यापार संबंध आणखी मजबूत करण्यासाठी रशिया नव्या पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.