कोविड सेंटर संदर्भात केलेले आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले

  59

पुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री यांनी आज या संदर्भात आपली भूमिका मांडताना सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले.


अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत कोविड सेंटरच्या अनुषंगानं होत असलेल्या आरोपांवरही चर्चा झाली. अजित पवार यांनी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांकडे भूमिका मांडली. जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. सगळी कामे पारदर्शक पद्धतीनं झाली आहेत,' असं अजित पवार यांनी सांगितलं.


“पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील आणि जिल्हाधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांचा कोविड सेंटरच्या कामामध्ये समावेश होता. या अधिकाऱ्यांना अतिशय पारदर्शकपणे हे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आजच्या बैठकीत पहिल्यांदा त्यावरच चर्चा करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी हे काम कसे केले आहे याची माहिती देण्यात आली आहे. कोविड सेंटरच्या बाबतीत काहीही चुकीचे होऊ दिलेले नाही,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला