नवी दिल्ली : राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त केंद्रीय संस्कृती, पर्यटन आणि ईशान्य भारत विकास मंत्री गंगापूरम किशन रेड्डी यांनी नागरिकांना विशेष आवाहन केले.
ट्वीटरद्वारे किशन रेड्डी म्हणाले, “राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. अतुल्य भारत साजरा करूया… देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटन महत्वाचे आहे. पर्यटनाचा शाश्वत विकास लोकप्रसिद्ध करण्यासाठी एकत्रित येत समर्पित होऊ. यंदा राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त ‘ग्रामीण पर्यटन’ यावर भर देऊ.”