निवडणुका ओबीसी आरक्षणासह की आरक्षणाशिवाय : फैसला १९ जानेवारीला

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षण (OBC Reservation) संदर्भात सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी लांबणीवर गेली आहे. आता या प्रकरणी बुधवारी (१९ जानेवारी) महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन्ही राज्यांच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन्ही राज्यांची यासंदर्भातली याचिका एकत्रितपणे कोर्ट ऐकणार आहे. ५ डिसेंबरचा आदेश मागे घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात आज अर्ज दाखल करण्यात आला आहे.


सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय याआधीच दिला आहे. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करून त्यानंतरच आरक्षण द्यावे, असा निर्णय न्यायालयाने दिला होता.


१७ डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासाठीची त्रिसूत्री पार पाडल्याशिवाय हे राजकीय आरक्षण लागू करता येणार नाही असा आदेश दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातल्या १०५ नगर पंचायतींच्या निवडणुकाही दोन टप्प्यांत पार पाडण्याची वेळ आली आहे. आयोगाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ओबीसीसाठी राखीव जागा या खुल्या प्रवर्गातल्या म्हणूनच गृहीत धरल्या जाव्यात असा आदेश कोर्टाने दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे.


त्यावर मध्य प्रदेश सरकारने विधिमंडळात ठराव करून निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्यपालांमार्फत निवडणूक आयोगाकडे केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही तसाच ठराव केला आहे.


परंतू, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार की आरक्षणाशिवाय यासाठी आता १९ जानेवारीची वाट पाहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

New Zealand Visa : न्यूझीलंडमध्ये आता भारतीयांची चांदी! ५,००० कुशल व्यावसायिकांना थेट वर्क व्हिसा, विद्यार्थ्यांसाठीही मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील व्यापारी संबंधांनी आता एक नवं वळण घेतले आहे. दोन्ही देशांनी मुक्त

इस्रोच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थाने नुकतेच एका ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील

दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई

८०० कारखाने बंद करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई करण्याच्या

राजस्थानातील १५ गावांमध्ये महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी

पंचायतीच्या ‘तुघलकी’ फरमानावरून उलट-सुलट चर्चा जालोर : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अजब

बडगाम NIA न्यायालयाचा मोठा निर्णय, अमेरिकेत राहणाऱ्या काश्मिरी लॉबिस्टची जमीन जप्त

बडगाम : जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातल्या एनआयए कोर्टाने मंगळवारी एक मोठा निर्णय दिला. अमेरिकेत राहणाऱ्या

पोलिसांसमोर २२ नक्षलवादी आले शरण

मलकानगिरी : मलकानगिरी जिल्ह्यात ओडिशा पोलिसांसमोर २२ नक्षलवादी शरण आले. आपल्या हातातील शस्त्र टाकून माओवादी