नवी दिल्ली: दिल्लीत पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले आहे. गाझीपूर फूल मार्केट येथे शुक्रवारी एका बॅगेत आयईडी बॉम्ब आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी तपासाला वेग आला असून दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता व रेकी करून हा बॉम्ब प्लांट करण्यात होता, अशी धक्कादायक माहिती प्राथमिक तपासातून पुढे येत आहे. दिल्लीतील गाझीपूर फूल मार्केटच्या गेट नंबर एकबाहेर एक बेवारस बॅग आढळून आली होती. बॅगमध्ये तीन किलो आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेट होते. त्यात टायमरही लावण्यात आला होता. हा स्फोट घडला असता तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. त्यामुळेच हा घातपाताचा कट असल्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादिशेने तपास केला जात आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहचली होती. त्याशिवाय एनएसजीकडूनही याप्रकरणी तपास करण्यात येत आहे.याबाबत माहिती मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एनएसजी टीमलाही पाचारण करण्यात आले. बॉम्ब स्क्वाडने तपासले असता बॅगमध्ये आयईडी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बॅग निर्जनस्थळी नेऊन एका खड्ड्यामध्ये या आयईडीचा नियंत्रित स्फोट घडवून आणण्यात आला. वेळीच याबाबत पावले उचलली गेल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर आता हा बॉम्ब कुणी ठेवला होता, हा सर्वात कळीचा प्रश्न असून पोलीस आणि इतर यंत्रणा युद्धपातळीवर तपास करत आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. संपूर्ण परिसराची रेकी करून, सर्व माहिती घेऊन त्यानंतर हा बॉम्ब प्लांट करण्यात आला, असेही उपलब्ध पुराव्यांवरून दिसत आहे. मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्यात कॅप्चर होणार नाही, याची दक्षता बॉम्ब प्लांट करणाऱ्या हल्लेखोराने घेतल्याचेही दिसत आहे. गेट नंबर एकजवळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…