मुंबई (प्रतिनिधी) :कोळीगीतांची मोहिनी सातासमुद्रापार लोकप्रिय करणारे सुप्रसिद्ध लोकशाहीर काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पारंपारिक कोळी गाण्यांचा बादशाह अशी त्यांची खास ओळख होती. डोल डोलतंय वाऱ्यावर माझी, डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला, वेसावची पारू, हिच काय गो गोरी गोरी पोरी, यासारखी अनेक कोळीगीतांचे ते गीतकार होते. मी हाय कोळी, सन आयलाय गो यासारखी अनेक कोळी गाण्यांचे ते गीतकार होते.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सुरुवातीला त्यांच्यावर अंधेरी पश्चिम या ठिकाणी असणाऱ्या ब्रह्मकुमारी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. केईएम रुग्णालयात उपचार घेत असताना पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सुप्रसिद्ध लोकशाहीर म्हणून काशीराम लक्ष्मण चिंचय यांना ओळखले जाते. विजय कठीण आणि काशीराम चिंचय हे दोघे सोबत गाणी बनवायचे. त्यांच्या सर्व कॅसेट ‘वेसावकर आणि मंडळी’ या नावाने व्हीनस कंपनीने प्रसिद्ध केल्या होत्या. या वेसावकर मंडळीने मानाची प्लॅटिनम डिस्कही मिळवली होती. फक्त भारतात नव्हे तर कोळी, आगरी पारंपरिक गाण्यांचा ठेका त्यांनी सातासमुद्रापार नेला. जात, धर्म, प्रांत या पलिकडे जाऊन त्यांनी निर्माण केलेल्या कोळी संगीताच्या ठेक्यावर सगळ्यांना नाचायला लावले.
काशीराम चिंचय यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचे फोटो पोस्ट करत हळहळ व्यक्त केली आहे. त्यांचे अनेक चाहते, तसेच आगरी कोळी समाजाकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ‘वेसावची पारू’ पोरकी झाली, अशी भावना अनेकजण व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी हेमा, मुलगा सचिन आणि तीन विवाहित कन्या असा परिवार आहे. त्यांच्यावर वेसावे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…