प्रहार    

सेनेला निवडणुकीत फटका बसणार

  32

सेनेला निवडणुकीत फटका बसणार पालघर (प्रतिनिधी) : वसई येथे एका हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मराठी पाट्या लावण्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा फटका बसेल, असे भाकीतही त्यांनी केले.

माध्यमाशी बोलताना सेनेने राज्यात व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानावर मराठी भाषेच्या पाट्या लावण्याच्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडले. मराठी पाट्यांसोबत हिंदी व इंग्लिश भाषांतील पाट्याही लागल्या पाहिजेत. शिवसेना जर केवळ मराठी पाटीचा आग्रह धरत असेल तर त्यांना येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलला होता, त्यावर शिवसेनेने कुरघोडी केली, असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आठवले यांनी हा मुद्दा राज ठाकरे यांचाच आहे, पण सेनेने तो आपल्या हाती घेतला आणि त्याबाबतचा आता त्यांनी कायदा केला. पण रिपाइंचा त्यास विरोध आहे. आगामी निवडणूक भाजप व आम्ही एकत्र लढवणार असून या निवडणुकीत सेनेचा पराभव अटळ आहे, असे त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा सानियासोबत साखरपुडा संपन्न, पाहा कोण आहे अर्जुनची होणारी पत्नी

मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी अतिशय आनंदाचं वातावरण आहे. त्याचा मुलगा, अष्टपैलू

लालबागचा राजा मंडळाकडून अग्निशमन दल घेते दिवसाला सव्वा लाख भाडे

भाडे कमी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सार्वजनिक

गणेशोत्सव मंडळांनी ‘ ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ स्वदेशी’ विषयी जनजागृती करावी – मुख्यमंत्री

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे

Devendra Fadnavis on Meat Ban: स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीचा निर्णय राज्य सरकारचा नाहीच! मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

ज्याला जे खायचं ते खात आहेत. आपल्या देशात प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे मुंबई: राज्यातील अनेक महापालिकांनी १५

मुंबई गणेशोत्सवासाठी सज्ज, चौपाटीवर विसर्जनाची तयारी!

मुंबई : गणेश चतुर्थीच्या आगमनामुळे मुंबईत जोरदार तयारी सुरू झाली आहे, विशेषतः गिरगाव चौपाटीवर, जे विसर्जनाचे एक

Dadar Kabutar Khana : "महापालिका निर्णय बदलणार नाही" माणसाचे आरोग्य सर्वोपरि, काय म्हणाले बीएमसीचे वकील ?

कबुतरखाना प्रकरणात बीएमसीचे स्पष्ट विधान मुंबई : दादर कबूतरखाना प्रकरणात सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत,