मुंबई पालिका आता व्हॉट्सअॅपवर

मुंबई (प्रतिनिधी) : शुक्रवारपासून मुंबई महापालिकेचे व्हॉट्सअॅप चॅट-बॉट सुरू झाले आहे. अशी सुविधा देणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली पालिका ठरली असून या सुविधेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. ‘व्हॉट्सअॅप चॅट-बॉट’द्वारे जनतेला ८० हून अधिक सुविधा घरबसल्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत.



व्हॉट्सअॅप चॅट-बॉट सुविधेमुळे नागरिकांना सगळी माहिती घरबसल्या मिळणार असून महापालिका, प्रशासन या यंत्रणांशी थेट संवाद साधता येणार आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेची ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ ही सुविधा ८९९९२२८९९९ या क्रमांकावर उपलब्ध असून या क्रमांकावर मराठीमध्ये ‘नमस्कार’ आणि इंग्रजीमध्ये ‘नमस्ते किंवा हाय’ असा संदेश पाठविल्यानंतर महानगरपालिकेच्या बोधचिन्हासहीत अधिकृत उत्तर प्राप्त होते. आपल्या आवश्यकतेनुसार नागरिकांद्वारे जे-जे पर्याय निवडले जातील, त्या-त्या पर्यायानुसार तब्बल ८० सेवा-सुविधांविषयीची माहिती नागरिकांना तत्काळ उपलब्ध होते.



यामध्ये संबंधीत पत्ते, संपर्क क्रमांक, संक्षिप्त माहिती यासारख्या बाबींचा समावेश असून या सुविधेतंर्गत उपलब्ध होणाऱ्या ८० सेवा-सुविधांविषयीची माहिती ही ‘लोकेशन’ आधारित पद्धतीने उपलब्ध होत आहे. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणाजवळ असणारे महानगरपालिका दवाखाने – रुग्णालये, कोविड केअर सेंटर, मनपा शाळा, उद्याने, पर्यटन स्थळे, अग्निशमन केंद्रे इत्यादी बाबींची माहिती तत्काळ उपलब्ध होणार असून या सुविधेद्वारे तक्रार वा सूचना करण्याची सेवा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या विविध ऑनलाईन सेवा-सुविधांशी संबंधीत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

...तर मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मागील चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील

मुंबई महापालिकेच्या या दोन विभागांना लाभले कायम सहायक आयुक्त

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदांच्या अनेक जागा रिक्त असून अनेक ठिकाणी प्रभारी सहायक

निवडणूक आयोग 'सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं'! राज ठाकरेंचा हल्लाबोल

पत्रकार परिषद पाहून मनसे अध्यक्ष संतापले; म्हणाले, 'आयोग निष्पक्ष नाही, महाराष्ट्रातील जनतेचा हा ढळढळीत

मेट्रो १' तात्पुरती विस्कळीत; प्रवाशांची तारांबळ

मुंबई : घाटकोपर- अंधेरी- वर्सोवा मेट्रो- १' सेवा तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास विस्कळीत

बॅगच्या अस्तरमध्ये लपवले होते ८७ लाख; दुबईहून आलेल्या प्रवाशाला अटक!

मुंबई कस्टम्सची मोठी कारवाई; विदेशी चलनाचा मोठा साठा जप्त मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय