नाशिक शहरातील ९३ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे

नाशिक (प्रतिनिधी ):कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरातील बाधितांचा आकडा वाढतच असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४,०६४ पर्यंत पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अवघे सात टक्के असून, ९३ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. सद्यस्थितीत २१५ रुग्ण महापालिका, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, यातील ६७ रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये कोमार्बिड रुग्णांसह लस न घेतलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यापासून शहरात कोरोनाने उसळी घेतली असून, दररोज बाधितांचा आकडा हा हजारापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नागरिक तसेच यंत्रणेत धडकी भरली असली तरी यातील बहुतांश बाधितांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असल्याचे समोर आले आहे. शहरातील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा पर्यंत ४,०६४ पर्यंत पोहचला आहे. परंतु, यातील ९३ टक्के रुग्ण हे अलगीकरणात असून, ते घरी राहूनच उपचार घेत आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणे असून, या रुग्णांच्या प्रकृतीवर महापालिका लक्ष ठेवून आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. विशेष म्हणजे शहरातील करोनातून बरे होण्याची टक्केवारी ही ९७ टक्यांपर्यंत आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण हे सुरुवातीला ९० टक्क्यांपर्यंत होते. त्यामुळे शहरात सध्या तरी कोरोनाची तिसरी लाट ही सौम्य ठरल्याचे चित्र आहे.


लसवंतांना दिलासा


शहरातील अॅक्टिव्ह ४,०६४ रुग्णांपैकी २१५ रुग्ण हे महापालिका तसेच इतर रुग्णालयात दाखल आहेत. यातील २१ रुग्ण हे डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात, तर ६२ रुग्ण हे बिटको रुग्णालयात दाखल आहेत. त्यात ६७ रुग्ण ऑक्सिजनवर असून, १९ रुग्ण हे आयसीयूत अपचार घेत आहे. अकरा रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. विशेष म्हणजे दाखल रुग्णांमधील रुग्ण हे लस न घेतलेले तसेच कोमार्बिड रुग्ण आहेत. त्यामुळे लसवंतांना कोरोनाचा धोका सध्या कमी असून, लस न घेतलेल्यांसाठी तिसरी लाट तापदायक ठरत असल्याचे चित्र आहे.
Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या