साळवी स्टॉप परिसरात जागोजागी कचरा

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी शहरामध्ये रस्त्याच्या किनारी प्लास्टिकचा कचरा जागोजागी पाहायला मिळतो. साळवी स्टॉप परिसरात तर जागोजागी प्लास्टिकचा कचरा पसरलेला दिसत आहे. त्यामुळे स्वच्छ रत्नागिरी सुंदर रत्नागिरी करण्याचे जनतेचे स्वप्न नगर परिषदेने धुळीला मिळवले आहे. प्लास्टिकचा कचरा नगर परिषद परिसरसह शहरातील विविध रस्त्यांच्या आजूबाजूला पडलेला दिसतो.

रत्नागिरी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्लास्टिकबंदी असतानाही कोणतीच कारवाई केली जात नसल्याने प्लास्टिकचा कचरा गावभर पसरलेला दिसतो. तीच स्थिती रत्नागिरी शहराची झाली आहे. रत्नागिरी शहरातील नगर परिषदेने व मागील सत्ताधाऱ्यांनी मोठा गाजावाजा करून साळवी स्टॉप येथे घनकचरा प्रकल्प प्रोसेसिंग युनिट सुरू असल्याची बतावणी केली. मात्र प्रत्यक्षात या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येतो. त्याची विल्हेवाट का लावली जात नाही. तेथे साचलेल्या कचऱ्यामुळे या परिसरातील इमारती आणि उंच वाढलेल्या झाडावर बगळेच बगळे पहायला मिळतात.  हे बगळे अनेकवेळा पाण्याच्या टाकीवर जाऊन बसतात तेथेच पिण्याच्या पाण्यात बगळ्यांची विष्ठा पडते आणि ती विष्ठा संपूर्ण शहरभर पिण्याच्या पाण्यातून पसरते की काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
Comments
Add Comment

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ कसे समोर आले?, प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक: राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर

गडचिरोली : ११ जहाल माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

- गडचिरोली पोलीस सीआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश एकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या

'जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र आणि राज्य शासनात सामंजस्य करार

- मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या करारावर स्वाक्षऱ्या राज्यातील प्रत्येक ग्राम

पुण्यात पेट्रोल महागले, इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांना फटका

पुणे: मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचा थेट परिणाम पुण्याच्या इंधन दरांवर झाला