Monday, July 15, 2024
Homeमहत्वाची बातमी‘ओव्हरहेड ऊर्जा पारेषण वाहिन्यांजवळ पतंग उडवणे टाळा’

‘ओव्हरहेड ऊर्जा पारेषण वाहिन्यांजवळ पतंग उडवणे टाळा’

मुंबई (प्रतिनिधी) : अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने (एईएमएल) मकर संक्रांतीदरम्यान पतंग उडवणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. ओव्हरहेड ऊर्जा पारेषण वाहिन्यांजवळ पतंग उडवू नये, असे आवाहन एईएमएलने केले आहे. हा सावधगिरीचा सल्ला सुरक्षित उत्सवाच्या भावनेने जारी करण्यात आला आहे.

पतंगाची तार किंवा मांजा, विजेची वाहक असते. यामुळे जर हा मांजा वीज वहन वाहिन्यांना स्पर्श झाल्यास किंवा वाहिन्यांच्या आकर्षण क्षेत्रात आला तरी त्याद्वारे भरपूर उच्च व्होल्टेज प्रसारित होऊ शकते. पारेषण वाहिन्यांजवळ असुरक्षित पतंग उडवल्याने कोणतीही अप्रिय घटना लक्षात आली किंवा कळली तर एईएमएलच्या १९१२२ या पॉवर हेल्प लाईनवर त्वरित कळवावे, असे आवाहन एईएमएलने ग्राहक आणि नागरिकांना केले आहे. यामुळे कंपनीकडून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल.

तसेच ग्राहक किंवा कंपनीच्या @Adani_Elec_Mum या सामाजिक माध्यमांच्या हँडललादेखील तसेच संकेतस्थळ किंवा अदानी इलेक्ट्रिसिटी अॅपलादेखील भेट देऊ शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -