साखर कारखान्याच्या माध्यमातून मोहोळमध्ये 26 कोटी रुपयांची वीज निर्मिती

सोलापूर :  मोहोळ तालुक्यातील चार साखर कारखान्याच्या माध्यमातून दोन महिन्याच्या कालावधीत 26 कोटी रुपयांची पाच कोटी 47 लाख युनिट वीज निर्मिती झाली आहे. यातील काही विज कारखान्यांनी वापरली आहे तर उर्वरित वीज एक्सपोर्ट केली आहे. या वीज निर्मिती मुळे साखर कारखान्यांना अतिरिक्त महसूल प्राप्त झाला असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला प्रति टन जादा भाव मिळण्याची आशा लागली आहे.

मोहोळ तालुक्यात भीमा, जकराया, आष्टी शुगर व लोकनेते हे चार साखर कारखाने आहेत. सध्या या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. साखर कारखाने सुरू होऊन साधारण दोन महिने झाले आहेत वरील वीज निर्मिती ही या कालावधीतील आहे. कारखानदारांचे केवळ ऊस गाळप करून त्यापासून फक्त साखर उत्पादन सुरू आहे. सारासार विचार केला व वाढत्या खर्चाचा हिशोब घातला तर फक्त साखर उत्पादन ही न परवडणारी बाब आहे. त्यासाठी उपपदार्थ निर्मिती असेल तर ऊस उत्पादक सभासदांना ज्यादा भाव देणे शक्य होणार आहे.
Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार