डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेबाबत खोडसाळपणा करण्यात आला. पंजाबचे कॉंग्रेस सरकार आणि पोलीस प्रशासनाने पंतप्रधान मोदी यांच्याबाबत योग्य ती दखल घेतली नाही. दरम्यान काही आंदोलकांनी पंतप्रधानांचा रस्ता अडवून त्यांच्या सुरक्षेवर आघात केला असा आरोप भाजपा करीत आहे. या घटनाक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना दीर्घायुष्य लाभो यासाठी डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली महामृत्युंजय जप आयोजित करण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील अरिष्ट्य टळावे व त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी भाजपा ग्रामीण मंडल कार्यालय, डोंबिवली येथे महामृत्युंजय जप व हवनाचा विधी संपन्न झाला. यावेळी आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर परब, युवा मोर्चाचे मितेश पेणकर, पूर्व मंडळाचे अध्यक्ष नंदू जोशी व प्रभाग क्रमांक ८५ चे अध्यक्ष संतोष शुक्ला, प्रभाग क्रमांक ११२ च्या अध्यक्षा राजश्री पैंजणकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी श्री महादेवाकडे नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…