सिंधुदुर्ग : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आजपासून राज्यात निर्बंध लागू झाले असताना आज मालवण शहरात सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजारासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या भल्या पहाटे नगरपालिका प्रशासनाकडून देऊळवाडा येथे अडविण्यात आल्या. तुमले मालवण- कसाल व सागरी महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागून वाहतूक विस्कळीत झाली. कोणतीही पूर्व सूचना न देताच प्रशासनाने आठवडा बाजार भरविण्यास मज्जाव केल्याने व्यापारी व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त आहे. यावेळी नगरपालिकेचा एक सफाई कामगारच ही कारवाई हाताळताना दिसत होता. यावेळी कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने नगरपालिकेच्या या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे राज्यभरात आज पासून नव्या निर्बंधांची अंमलबजावणी होत आहे. मालवणात दर सोमवारी आठवडा बाजार भरत असल्याने नेहमीप्रमाणे पहाटेपासून परजिल्ह्यातील भाजी, फळ, कपडे व इतर वस्तू विक्रीचे व्यापारी मालवणात दाखल होत होते. मालवण बाजारपेठेबरोबरच मालवणचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा येथेही हे व्यापारी दुकाने थाटतात. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मालवणात दाखल होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या या गाड्या देऊळवाडा येथेच नगरपालिका प्रशासनाकडून अडवून आठवडा बाजार भरविण्यास मज्जाव करण्यात आला. नगरपालिकेच्या एका सफाई कामगारानेच या गाड्या अडविल्याचे समोर येत आहे. गाड्या अडविण्यात आल्याने देऊळवाडा येथून मालवण- कसाल मार्गावर आणि बाजूलाच असलेल्या सागरी महामार्गावर व्यापाऱ्यांच्या गाड्यांची मोठी रांग लागली. यामुळे दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली.
दरम्यान, ही कारवाई करण्यास नगरपालिकेचा कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने एकट्या सफाई कामगाराने ही कारवाई हाताळल्याचे दिसून आले. कोणतीही पूर्व सूचना न देताच आठवडा बाजार भरविण्यास मज्जाव करण्यात आल्याने व्यापारी व नागरिकांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करत एका सफाई कामगारकडून होणाऱ्या या कारवाई बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…