पोलादपूर :तालुक्यातील कापडे बुद्रुक येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ नुकताच झाला. येथील नामवंत रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हनुमंत जगताप, राजिप सदस्य सुमन कुंभार आणि चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कापडे बुद्रुक येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठीच्या लसीकरणाचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष हनुमंत जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य व माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, जिल्हा परिषद सदस्या सुमन कुंभारहे व्यासपीठावर हजर होते. या लसीकरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वरदायिनी, माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष सि. दौ. सकपाळ यांनी भुषविले. तर संस्थेचे सहकार्यवाहक महेंद्र पाटेकर, विश्वस्त संजय मेहता, पोलादपूर पंचायत समितीचे उपसभापती शैलेश सलागरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, प्राचार्य रविकांत सकपाळ, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय सलागरे, रामदास सकपाळ, संतोष सकपाळ व सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होता. लसीकरणाला प्रारंभ हाेताच १५ ते १८ या वयोगटातील मुलांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली. तसेच त्यांनी शिस्तीने रांगेत उभे राहून लस घेतली.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…