चिपळुणात वाळू उत्खननाची मिळेना परवानगी

चिपळूण :पावसाळा संपून तीन महिने ओलांडले आहेत. येथील वाळू व्यावसायिकांनी वाळू उत्खननासाठी परवाने मिळविण्यासाठी प्रशासनाकडे कागदपत्रांच्या पूर्ततेसह पैसेही भरले आहेत. या प्रक्रियेला महिना ओलांडून गेला तरी शासन स्तरावरून वाळू उत्खननासाठी परवानगी मिळाली नसल्याने येथील वाळू व्यावसायिक कमालीचे अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, वाळू व्यवसायासाठी परप्रांतातून आणलेल्या कामगारांना बसून पगार द्यावा लागत असल्याने वाळू व्यावसायिकांची दमछाक होऊ लागली आहे. वाशिष्ठी खाडीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाळूचे उत्खनन केले जाते. यातून लाखोंचा महसूल शासनाला मिळतो. दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर वाळू परवान्यासाठी व्यावसायिक प्रशासनाकडे अर्ज करतात. मात्र यावर्षी बहुतांशी कार्यालयातील अधिकारी याकडे तितकेसे लक्ष देताना दिसत नाहीत.

वाळू उत्खननाला परवानगी मिळत नसल्याने काहीजण रात्रीच्यावेळी बेकायदा उत्खनन करून वाळूची चोरटी विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. काही दिवसांपूर्वी गोवळकोट परिसरातही अशाच प्रकारची घटना घडली होती. पाच व्यावसायिकांनी महिनाभरापूर्वीच वाळू उत्खननाचे परवाने मिळावेत म्हणून खनिकर्म विभागाकडे सर्व कागदपत्रांसह अर्ज केले आहेत. मात्र, त्यांच्या तहसीलदार चौकशीपासून पुढील सर्वच प्रक्रिया धीम्यागतीने सुरू असल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
Comments
Add Comment

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय