साथरोग उद्भवू नये यासाठी धूर व औषध फवारणी

ठाणे  : शहरामध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत धूर, औषध फवारणी करण्याचे आदेश दिल्यानंतर विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात धूर व औषध फवारणी सुरू आहे. दरम्यान पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी प्रत्यक्ष घरी जाऊन पाण्याची तपासणी करण्यात येत आहे.



ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये माहे डिसेंबर, २०२१ मध्ये डेंग्युचे संशयित रुग्णसंख्या २२ आणि निश्चित निदान केलेले ०१ रुग्णसंख्या आहे. तसेच मलेरियाचे माहे डिसेंबर २०२१ मध्ये फक्त ७४ तर चिकनगुनियाचे संशयित १४ रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागाच्या वतीने शहरात गृहभेटी देऊन तपासणी करण्यात येत असून एकूण ३५,९०३ घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,७९३ घरे दूषित आढळून आली. तसेच एकूण ५३,४९३ कंटेनरची तपासणी केली असता त्यापैकी १,९३३ कंटेनर दूषित आढळून आले. यापैकी ४८९ दूषित कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले, तर १४२७ दूषित कंटेनर रिकामे करून काही कंटेनरमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले.



दरम्यान महापालिका कार्यक्षेत्रात ९० हॅण्डपंप, १० ट्रॅक्टर्स, ७ ई-रिक्षा, ८ बोलेरो वाहनामार्फत दोन सत्रात २१६४ ठिकाणी औषध फवारणी आणि ४० धूर फवारणी हॅण्डमशीनव्दारे १७,०६८ ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई