जोहान्सबर्ग : भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग (Johannesburg Test) सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचं सावट दिसतंय. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ उशीरानं सुरु होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं पारडं जडं दिसत आहे. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 122 धावांची गरज असून त्यांचे आठ विकेट्स शिल्लक आहेत. तर, हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या 8 विकेट्स मिळवाव्या लागतील, जे थोडं कठीण दिसत आहे.
जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्या दिवसाअखेरपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 40 षटकांत 2 विकेट्स गमावून 118 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी केवळ 122 धावांची गरज आहे. यामुळं हा कसोटी सामना निर्णायक वळणावर आहे. चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट झाले असून आफ्रिका उर्वरित 122 धावा करणार की भारताचे गोलंदाज शिल्लक आठ विकेट्स घेऊन ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब करतील? हे पाहणे रंजक ठरेल.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…