मुंबई-आग्रा महामार्गाला कचऱ्याचा विळखा

  152

शहापूर  : मुंबई-आग्रा महामार्गालगत पडघा ते कसारा दरम्यान रस्त्यालगत दोन्ही बाजूस कचऱ्याचा वेढा पडल्याने या कचऱ्यावर उंदीर, घुशी, डुकरांचा मुक्त संचार सुरू असतो, तर कुजलेल्या कचऱ्याने नागरिकांसोबत प्रवाशांना दुर्गंधीचा सामाना करावा लागत आहे.
याबाबत महामार्ग प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

प्रामुख्याने महामार्गालगत असलेल्या ग्रामपंचायतीकडे हक्काचे डम्पिंग ग्राऊड नाही, त्यामुळे बहुतांशी ग्रामपंचायती कचऱ्याची विल्हेवाट महामार्गालगत लावताना दिसतात. अगदी खडावली फाट्यापासून ते वासिंद, आसनगांव, शहापूर, खर्डी, कसाराजवळील महामार्गालगत अनेक ठिकाणी प्लास्टिक, दुकानातील टाकाऊ पदार्थ, शिल्लक राहिलेले मांस, कोंबडीचे पंख, सडलेली अंडी, हॉटेलमधील शिल्लक राहीलेले अन्न यांची विल्हेवाट लावली जाते. या कचऱ्यावर मोठ्या प्रमाणात उंदीर, घुशी, डुकरे फिरताना दिसतात़ तर कुजलेल्या कचऱ्याने दुर्गंधीसोबत विविध आजारांची लागण होत आहे़

हा कचरा टाकण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींना हक्काची जागाच नसल्याने पर्यायी जागा म्हणजे मुंबई-आग्रा महामार्गाच्या दोन्ही बाजूस त्याची विल्हेवाट लावली जात आहे़ यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
महामार्ग प्राधिकरण याकडे डोळेझाक करत असल्याने वाहनचालकांसह प्रवासीवर्गात प्रचंड संताप व्यक्त करत आहेत़
Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही