तळोजा कारागृहातील कैद्यांसाठी कोविड लसीकरण शिबीर

नवीन पनवेल : जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी दि. ६ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पनवेल महानगरपालिका व तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात कारागृहात नवीन दाखल झालेल्या कैद्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला. तळोजा मध्यवर्ती कारागृहातील दाखल २ हजार ८१८ कैद्यांपैकी २ हजार ८१६ कैद्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यापूर्वीच २ हजार १८० कैद्यांना कोविड लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने दिली आहे. यावेळी तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार, पनवेल तहसीलदार विजय तळेकर, नायब तहसीलदार संजीव मांडे तसेच पनवेल महानगरपालिकेचे लसीकरण वैद्यकीय पथक उपस्थित होते.
Comments
Add Comment

सांताक्रुझमध्ये सिलेंडर स्फोट, चार जखमी

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील सांताक्रुझ पश्चिम येथून एक धक्कादायक बातमी आली आहे. सांताक्रुझ पश्चिमेच्या

भोगवादी प्रवृत्तीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : प्राचीन शिक्षणपद्धतीत मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण दिले जात होते. मात्र

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी साधला अंतराळवीरांशी संवाद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर (निवृत्त) राकेश शर्मा व भारताचे दुसरे अंतराळवीर

शिवजयंती उत्सव निमित्त मुंबईत विविध ठिकाणी कार्यक्रम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त, मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित

मुंबईत स्थायी समितीवर प्रथमच भाजपचा अध्यक्ष

स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे हे शुक्रवारी होणार विराजमान भाजपचे तीन दशकांचे स्थायी समिती

महापालिका स्वच्छता कामगारांची विशेष कर्करोगाची तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे हजारो स्वच्छता कर्मचारी मुंबईचा