सांताक्रुझमध्ये सिलेंडर स्फोट, चार जखमी

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील सांताक्रुझ पश्चिम येथून एक धक्कादायक बातमी आली आहे. सांताक्रुझ पश्चिमेच्या दिघे चाळ येथे एका खोलीत सिलेंडरचा स्फोट झाला. या सिलेंडर स्फोटामुळे चार जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.


सिलेंडर स्फोटाची घटना आज म्हणजेच गुरुवार १९ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी घडल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. माहिती मिळताच अग्निशमनदलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. आवश्यक ती कारवाई करून अग्निशमनदलाने थोड्याच वेळात आग नियंत्रणात आणली. सर्व जखमींना रुग्णालयांत पाठवण्यात आले.


व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जखमींपैकी तीन जणांना पुढील उपचारांसाठी एलटीएमजी सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्व जखमींबाबतची सविस्तर माहिती रुग्णालय प्रशासनाने प्रसारमाध्यमांना दिली आहे.



जखमींची नावं



  1. जावेद अब्दुल शियाख, वय ३० वर्षे - ५५ ते ६० टक्के भाजले - एलटीएमजी सायन रुग्णालयात हलवले.

  2. अवंतिका अजय गावडे, वय ४५ वर्षे - ३० टक्के भाजले - एलटीएमजी सायन रुग्णालयात हलविण्यात आले.

  3. सुमती रमेश गावडे, वय ६५ वर्षे - ३५ ते ४० टक्के भाजले - एलटीएमजी सायन रुग्णालयात हलविण्यात आले.

  4. यश गावडे , १५ वर्षे - १० ते १२ टक्के भाजले - प्रकृती स्थिर.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

- तब्बल ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला साठा चार दिवसांत दीड टक्क्यांनी झालाय कमी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई पाणी

Global Warming : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका; मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा

- भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) भविष्यात उद्भवणाऱ्या जागतिक तापमान वाढ (ग्लोबल

Ganeshotsav 2026 ST Buses : बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरमधून धावणार शेकडो जादा बसेस; ‘या’ तारखेपासून विशेष सेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला