महापालिका स्वच्छता कामगारांची विशेष कर्करोगाची तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे हजारो स्वच्छता कर्मचारी मुंबईचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी समर्पित भावनेने अविरतपणे काम करत असतात. पण हे काम करत असताना त्यांचे आरोग्यही महत्त्वाचे असते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाच्या पुढाकाराने आणि टाटा स्मारक रुग्णालयाच्या सहकार्याने मुंबईतील विविध ठिकाणी कर्करोग तपासणी आणि जनजागृती करिता विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.


मुंबई महानगरपालिकेचे विविध कर्मचारी आणि कामगार हे मुंबईत दररोज सार्वजनिक ठिकाणी निर्माण हेणारा कचरा गेळा करणेसंकलन करणे, रस्त्यांची स्वच्छता करणे, नाले तसेच सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करणे आदी कामे करीत असतात. ही कामे करताना दुर्गंधी, धूळ, आणि आरोग्यास हानिकारक अशा घटकांशी कर्मचाऱ्यांचा संपर्क येतो. काही कर्मचारी, कामगार हे व्यसनाधीन होतात. या कारणांनी त्यांना कर्करोगांसारख्या विविध आजारांना सामोरे जावे लागते. यामुळे कर्मचाऱ्याच्या शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होतो.


या सर्व बाबींपासून त्यांना परावृत्त करणे आणि त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी उप आयुक्त (परिमंडळ- २) प्रशांत सपकाळे, एफ दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त वृषाली इंगळे यांच्या पुढाकाराने टाटा स्मारक रुग्णालयाच्या सहकार्याने विशेष कर्करोग तपासणी व जनजागृती आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.


या शिबिरामध्ये टाटा स्मारक रुग्णालयाच्या कर्करोग प्रतिबंध विभागाचे तज्ज्ञ वैद्यकीय मंडळी आणि त्यांच्या पथकांकडून कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने कर्करोग तपासणी करण्यात आली. तसेच, महिला कामगार यांना स्तनांच्या कर्करोगाची पूर्व अवस्था वेळीच ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठी आधुनिक ‘एचपीव्ही सेल्फ सॅम्पलिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून कर्करोग तपासणी आणि निदान करण्यात आले. त्यासोबतच तंबाखू, मद्यपान आदी व्यसनांचे दुष्परिणाम समजावून देत, व्यसनापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात आले. तसेच, पुढील तपासणीसाठी टाटा स्मारक रुग्णालयाच्या कर्करोग प्रतिबंध विभागात पाठविण्यात आले

Comments
Add Comment

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची

Mumbai Bomb Threat : मुंबईत खळबळ! महापौर कार्यालय, BMC मुख्यालय आणि मेट्रो स्थानकांना बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मुंबई महापौर कार्यालय,

Mumbai Local Train : मुंबई लोकलमध्ये वडाळाजवळ पुरुषाकडून महिलेला बेदम मारहाण; बेल्ट काढून धमकी, सहप्रवाशी ठरले मूकदर्शक!

मुंबई : मुंबईकरांची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या 'लोकल ट्रेन' (Mumbai Local Train) मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा

Birthday Celebration Firing : 'बड्डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा'; रस्त्यात सेलिब्रेशन अन् बेबी एअरगनमधून गोळीबार महागात पडली

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये बेबी एअरगनमधून गोळीबार;10 जणांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी ताब्यात बोरिवली :