मुंबईत स्थायी समितीवर प्रथमच भाजपचा अध्यक्ष

स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे हे शुक्रवारी होणार विराजमान


भाजपचे तीन दशकांचे स्थायी समिती अध्यक्षपदाचे स्वप्न होणार साकार


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडणार असून विरोधी पक्षांनी उमेदवार न दिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे निवडणुकीची औपचारिकता केवळ पार पाडली जाणार असून स्थायी समितीवर प्रभाकर शिंदे यांची अध्यक्ष म्हणून निवड होणार आहे. त्यामुळे भाजपचा प्रथमच स्थायी समिती अध्यक्ष मुंबई महापालिकेत निवडून येणार असून हा मान प्रभाकर शिंदे यांना मिळणार आहे.


मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्यावतीने अनुक्रमे राजेश्री शिरवडकर आणि प्रभाकर शिंदे यांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिका सचिव मंजिरी देशपांडे यांना सादर केले. परंतु प्रतिस्पर्धी पक्षाकडून कोणीही उमेदवारी न भरल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्यामुळे शुक्रवारी केवळ निवडणुकीची औपचारिकता पार पाडून पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहणाऱ्या महापौर रितू तावडे या स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांची निवड झाल्याचे जाहीर करतील.


प्रभाकर शिंदे हे १९९७मध्ये सर्व प्रथम महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांची अभ्यासू वृत्ती आणि वक्तृत्व यामुळे १९९८मध्ये महापौर परिषदेत त्यांची सदस्य म्हणून निवड झाली होती . बेस्ट समितीचे दोन वेळा अध्यक्षपद त्यांन भुषवले होते. त्यानंतर २००२मध्ये ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर २००२ ते २००६ या कालावधीत त्यांनी सभागृहनेतेपद भूषवले होते. त्यानंतर सलग २०१२ पर्यंत नगरसेवक होते. पण २०१२मध्ये ते पराभूत झाल्यानंतर त्यांनी २०१७च्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते निवडून आले. त्यानंतर २०२०मध्ये त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते विजयी होत पाचव्या नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला आहे. भाजपचे अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. भाजप २०१७ पर्यंत तत्कालिन शिवसेनेसोबत असले तरी त्यांच्या वाट्याला महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद गेले नव्हते. परंतु यंदा त्यांच्या वाट्याला आजवर प्रतीक्षेत असलेले महापौरपदासह स्थायी समिती अध्यक्षपदही आले आणि भाजपचे पहिले स्थायी समिती अध्यक्ष बनण्याचा बहुमान प्रभाकर शिंदे यांना लाभला आहे.


शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर होणार विराजमान


मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदाची शुक्रवारी सकाळी निवडणुकीची औपचारिकता पार पाडून भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर या एकमेव उमेदवार असल्यामुळे पिठासीन अधिकारी म्हणून महापौर रितू तावडे या शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर यांची निवड झाल्याचे घोषित करतील. त्यामुळे शिक्षण समितीवर बऱ्याच कालखंडानंतर भाजपचा नगरसेवक विराजमान होणार असून भाजपच्या हाती तिजोरीच्य चावीसोबतची शिक्षण व्यवस्थेचीही गुरुकिल्ली असणार आहे. यापूर्वी विद्यमान महापौर रितू तावडे, विनोद शेलार आदी भाजपच्या नगरसेवकांनी युतीच्या काळात शिक्षण समिती अध्यक्षपद भूषवले आहे.


राजेश्री शिरवडकर यांचे आवाहन


शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीची औपचारिकता केवळ शिल्लक असून शिक्षण समितीवर राजेश्री शिरवडकर यांची निवड होणार आहे. त्यामुळे शिक्षण समिती अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर व्यक्तीश: भेटून शुभेच्छा देण्यासाठी हार,तुरे आणि पुष्पगुच्छ तसेच अन्य भेटवस्तू न देता त्याऐवजी काही आणायचे असेल तर लॉंग नोटबुक घेऊन यावे, असे आवाहन कार्यकर्त्यांसह हितचितकांना शिरवडकर यांनी केले आहे. जेणेकरून हार,पुष्पगुच्छ यांच्या माध्यमातून वाया जाणारा निधी आपण मुलांच्या शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने अशाप्रकारच्या लाँगनोटबूकसह इतर शालेय वस्तूंच्या माध्यमातून सार्थकी लावू शकतो.या माध्यमातून प्राप्त होणारे शालेय साहित्य हे गरीब गरजू विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत त्यांचे शिक्षणाचे हात बळकट करण्याचे आणि त्या मुलांची स्वप्ने मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल,असे त्यांनी नमूद केले आहे.

Comments
Add Comment

BMC : इतर प्राधिकरणांच्याा जमिनीवर विकासकामे करताना अडचणींचा डोंगर

अतिरिक्त आयुक्तांनी दिला समन्वय राखण्याचा सूचना मुंबई : मुंबईतील (Mumbai) विविध प्राधिकरणांच्या हद्दीत आरोग्य

Mahim Crime : धक्कादायक! मोबाईलच्या किरकोळ वादावरून थेट चाकूचे सपासप वार; माहिम स्टेशनबाहेर तरुणावर हल्ला

मुंबई : मुंबईत किरकोळ कारणावरून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

BMC News : महापालिका सभागृह आता भरणार दर सोमवारी आणि गुरुवारी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभा या महिन्याला चार किंवा पाच घेण्याची प्रथा असली तरी या महापालिकेत अभ्यासू

Central Railway Mega Block : रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; 'या' मार्गांवरील लोकल १५ मिनिटे उशिराने धावणार

मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वेचा (Central Railway) रविवारी, २८ जून रोजी विविध अभियांत्रिकी (Engineering) आणि देखभाल (Maintenance) कामांसाठी

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा