सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. त्याआधी त्यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. सिंधुताई यांच्या पार्थिवावर महानुभव पंथाप्रमाणे दफनविधी करण्यात आले. पुण्यातील ठोसर पागा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी (ता.४) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. सुमारे दीड महिन्यांपूर्वी सिंधूताई यांना हार्नियाच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या आजारावरील उपचारासाठी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतरही रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार चालूच होते. मात्र मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास उपचार चालू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.


दरम्यान, सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील सन्मती बालनिकेतन येथे आणण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Comments
Add Comment

उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस; व्हीव्हीपॅट नाही, तर मतपत्रिका हवी!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर याचिका नागपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट

पार्थ पवार जमीन घोटाळा: अजितदादा काय म्हणतात, प्रत्यक्ष 'ऐका'!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्याने राजकीय

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

रांजणी येथील ड्रायपोर्टसाठी सकारात्मक काम करा - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट व्हावा अशी मागणी या भागातील

काँग्रेसमध्ये 'सपकाळ विरुद्ध केदार' वाद शिगेला!

नागपूरमध्ये गटबाजीचा स्फोट; प्रदेशाध्यक्षांनी इच्छुकांच्या 'मुलाखती'ची बैठकच ठरवली 'अवैध'! नागपूर : नागपूर

Buldhana Horror : बुलढाण्यात थरार! मुलाने कुऱ्हाडीने आई-वडिलांची हत्या करून स्वतःही संपवले जीवन, २ चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला

बुलढाणा : नात्यांना काळीमा फासणारी एक हादरवणारी आणि हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील