लस घेतली नाही, असे नागरिक बाहेर फिरताना आढळले तर क्वारंटाईन करणार

पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या डोसची तारीख उलटूनही लस घेतली नाही, असे नागरिक बाहेर फिरताना आढळले तर त्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मावळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने आमदार सुनील शेळके यांनी मावळ वासीयांना लस घेण्याचे आवाहन करत क्वारंटाईन करण्याचा इशारा दिला आहे.

मावळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढु लागले असून नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे गरजेचे असुन येत्या 15 जानेवारी पुर्वी कोरोना लसीचे दोन डोस मुदतीत घेणे अनिवार्य असून ज्यांची दुसर्या डोसची मुदत होऊनही डोस न घेतल्यास 15 जानेवारी नतंर ती व्यती बाहेर आढळ्यास त्याला क्वारंटाईन करण्यात येईल असा इशारा मावळचे आ. सुनिल शेळके यांनी दिला.

मावळ तालुक्यात येत्या दोन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असुन त्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्बंध पाळण्यासाठी आज मावळ तालुक्यातील आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी यांची बैठक येथील पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली त्या वेळी आमदार सुनिल शेळके बोलत होते.
Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगरात भाजपची मुसंडी

सत्तेसाठी शिवसेनेचा अथवा इतरांचा घ्यावा लागणार आधार छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने २९

पुणे महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल आंदेकर; प्रभाग २३ मध्ये धंगेकरांना धक्का

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मधून एक वेगळाच राजकीय निकाल समोर आला आहे. नाना पेठ आणि

Pune Andekar Family : सूनेनंतर सासूनेही मारलं मैदान ! पुण्यात लक्ष्मी आंदेकरचा थरारक विजय

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मध्ये चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत सूनेनंतर आता

Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालन्यातून विजयी, राजकीय पक्षांच्या दिग्गजांना चारली धूळ

जालना : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालांत जालन्यातून एक धक्कादायक आणि चर्चेचा निकाल समोर आला आहे. ज्येष्ठ

Pune Mahapalika Result : पुणे महापालिका निकाल : एकत्र येऊनही काका पुतण्याचं नुकसान, भाजप आघाडीवर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निकालात भारतीय जनता पक्षाने स्पष्ट आघाडी घेत शहराच्या राजकारणात आपली ताकद दाखवून

जळगावकर म्हणतायत.. तुमची आमची भाजपा सर्वांची! भाजपचा हा नेता ठरला धुरंधर

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणात शतप्रतिशत विजय मिळवला आहे.