सिंधुदुर्ग : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयाची आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, अशी महिती जिल्ह्यचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. जिल्ह्यातल्या पत्रकारांशी त्यांनी दूर दृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जो शुन्या पर्यंत आला होता तो आता झपाट्यानं वाढून १४.६५ टक्क्यावर पोहोचला आहे. हि गोष्ट चिंतादायक असली तरी यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात १ हजार ९०० बेड, पुरेसे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याचे ते म्हाणाले. १५ ते १८ वयोगटातल्या ४० हजार मुलांना लस देण्याचं उद्दिष्ट असून १० दिवसात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.
त्याच बरोबर येत्या १० जानेवारी पासून ६० वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचे पालक मंत्र्यांनी सांगितलं. जिल्ह्यात लसीची कमतरता नाही. ६६ हजर ८०० लस साठा उपलब्ध असून तो पुरेसा असल्याचे पालकमंत्री म्हणाले. लॉकडाऊन बाबत जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांशी, लोक प्रतिनिधींशी, व्यवसायकांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल असे श्री. सामंत म्हणाले. रात्रीची संचारबंदी कडक करा आणि मास्क वापरणे बंधनकारक करा अशा सूचना पोलिसांना दिल्याचे पालकमंत्री म्हणाले.
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…