कोरोना काळात कर्नाटकची भूमिका आडमुठीच

सोलापूर : नागरिकांना कर्नाटक राज्यात प्रवेश देण्याबाबत कर्नाटक सरकारची भूमिका नेहमीच आडमुठेपणाची राहिली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असतील देशात, परदेशांतही प्रवेश दिला जात असताना आरटीपीसीआरची सक्ती करून नागरिकांना परत पाठवण्याची कर्नाटक सरकारचा निर्णय योग्य नाही. याबाबत मी स्वत: कर्नाटक सरकारला पत्र पाठवून विनंती करणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

कर्नाटक सरकारकडून कोगनोळी टोल नाक्यावर कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाही आरटीपीसीआर चाचणीची सक्ती करून परत पाठवले जात आहे. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने राज्यांमधील प्रवेशाबाबत काही निकष घालून दिलेले आहेत. दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी अहवाल असा निकष आहे. दोन डोस झाले असतील देशात, परदेशात कुठेही फिरता येते, मग कर्नाटकात प्रवेश का दिला जात नाही? कर्नाटकमध्ये नागरिकांना रोज ये-जा करावी लागते, व्यवहार करायचे असतात. गडहिंग्लज, चंदगडला कोगनोळीवरून जावे लागते. असे असताना राष्ट्रीय महामार्ग बंद करणे चुकीचे आहे. याबाबत मी स्वत: कर्नाटक सरकारशी पत्र व्यवहार करून विनंती करणार आहे.
Comments
Add Comment

Mira-Bhayander Police Recruitment: पोलीस भरतीदरम्यान तरुणाला रंगेहाख पकडलं, नेमकं घडलं काय?

मुंबई: सध्या अनेक ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे. दरम्यान मीरा भाईंदरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत एक

Pune: पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; पळून जाण्याच्या नादात महिलेचा...

पुणे: पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रूट स्पा सेंटरवर

Latur: वडिलांच्या निधनानंतर अवघ्या दीड तासात दिला बारावीचा पेपर; शिवानीची जिद्द मनाला चटका लावून गेली

लातूर: लातूरमधील एका १७ वर्षीय मुलीच्या जिद्दीला सलाम करणारी घटना समोर आली आहे. या मुलीने शिक्षणासाठी दाखवलेली

Maharashtra Agri AI : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले महाराष्ट्र ‘अॅग्री एआय पॉलिसी’चे कौतुक

मुंबई : महाराष्ट्राने जाहीर केलेली स्वतंत्र ‘अ‍ॅग्री एआय पॉलिसी’ स्वागतार्ह असून इतर राज्यांनीही त्याचे

Pune Airport: हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानसेवा रद्द

पुणे: थायलंडच्या सहलीचं नियोजन करणाऱ्या पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. प्रसिद्ध विमान कंपनी 'इंडिगो'ने

Buldhana News : शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; गावात संचारबंदी लागू

बुलढाणा : बुलढाणा मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरु झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. याच