मात्र प्रशासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्याने पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आज दिवसभरात 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच खाजगी लॅब मधून 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये मात्र कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. हे सर्व रुग्ण हे मनपा हद्दीतील रहिवासी आहेत.