मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) सरळसेवेने विविध संवर्गातील पदांची भरती परीक्षेची तारीख म्हाडाने पुन्हा एकदा नुकतीच जाहीर केली आहे. या परीक्षा २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी यादरम्यान होणार आहे.
मात्र, २९ जानेवारी रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा आणि ३० जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा जाहीर झाली आहे. त्यामुळे या परीक्षा देणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) २ जानेवारी रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता ह्या परिक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयोगाने एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक १ आणि पेपर क्रमांक २ या तीनही परीक्षा अनुक्रमे २३, २९ आणि ३० जानेवारीला होणार आहेत.
१२ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत सुरुवातीला म्हाडाची परीक्षा जाहीर करण्यात आली होती. मात्र, परीक्षेच्या एक दिवस अगोदर पेपर फुटल्याची बातमी आल्याने परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलल्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले होते. मात्र, आता पुन्हा परीक्षा जाहीर केली असून २९ जानेवारी या दिवशी इतर कोणत्या परीक्षा आहेत की नाही याची कोणतीही खातरजमा केली नसल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे यांनी केला आहे. त्यामुळे या दिवशीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…