मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकार दिनी दि. ६ जानेवारी रोजी देण्यात येणारे विविध पुरस्कार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी जाहीर केले.


कार्यक्रमाचा शुभारंभ ओमकार आर्टस् प्रस्तुत `शतदा प्रेम करावे...' या मराठी गीतांच्या वाद्यवृंदाने सायं. 5.00 वाजता होईल.


सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून लोकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे कार्यवाह विष्णू सोनवणे यांनी केले आहे.



पुरस्कार आणि तपशील पुढीलप्रमाणे


1. आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार : बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार देवेंद्र कोल्हटकर (झी 24 तास)


2. जयहिंद प्रकाशन पुरस्कार : पत्रकारितेला उपयुक्त ठरणाऱ्या विषयावर (उदा. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी) लेखन लिहिणाऱ्या पत्रकाराचे चालू सालातील उत्कृष्ट पुस्तक : शामसुंदर सोन्नर (ज्येष्ठ पत्रकार).


3. कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार : कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार : नितीन बिनेकर (ईटीव्ही भारत)


4. विद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार : पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा पुरस्कार : मुकेश माचकर (कार्यकारी संपादक `मार्मिक')


5. रमेश भोगटे पुरस्कार : उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणारा पुरस्कार : समीर मणियार (दै. महाराष्ट्र टाईम्स)


6. `शिवनेर'कार विश्वनाथराव वाबळे स्मृती पुरस्कार : शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट बातम्यांसाठी दिला जाणारा पुरस्कार : सीमा महांगडे (दै. लोकमत)


दि. 6 जानेवारी रोजी प्रवक्ते न्या. मृदुला भाटकर यांच्या हस्ते सायं. 6.00 वाजता पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई 400 001 येथे हे पुरस्कार वितरीत केले जातील.

Comments
Add Comment

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो

मदर डेअरीचे टेट्रा पॅक दूध आजपासून प्रति लिटर २ रुपयांनी स्वस्त

मुंबई: मदर डेअरीने आपल्या युएचटी दूधाच्या (टेट्रा पॅक) किमतींमध्ये २ रुपयांची कपात करण्याची घोषणा आज, मंगळवारी

मुंबई मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद, एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांच्या