**EDS: VIDEO GRAB** New Delhi: NCP MP Supriya Sule speaks in the Lok Sabha during the Budget Session of Parliament, in New Delhi, Monday, July 01, 2019. (LSTV/PTI Photo) (PTI7_1_2019_000046B)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule ) यांना कोरोनाची (corona ) लागण झाली आहे. ट्विटरवरून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
“मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या असे ट्वीट सुप्रीया सुळे यांनी केले आहे.
दरम्यान, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं नुकतचं निष्पन्न झालं आहे. वर्षा गायकवाड सोमवारी अधिवेशनात उपस्थित होत्या. अनेक मंत्री, आमदार वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानंतर आता सुप्रीया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सुप्रीया सुळे यांनी ट्विटरवरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिल्यानंतर ‘ताई काळजी घ्या, ताई लवकर बऱ्या व्हा, अशा प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या आहेत. तर अनेक युजर्सकडून सुप्रीया सुळे यांचे हे ट्वीट रिट्वीट करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…