महाराष्ट्रमहत्वाची बातमी
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
December 28, 2021 05:02 PM
सिन्नर: सिन्नर जवळ पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये बिबट्या ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचे शव ताब्यात घेतले. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी सातत्याने बिबट्यांचा वावर सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वीच सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या कासारवाडी येथे बिबट्या दिसला होता. त्यानंतर याबाबतची तक्रार वनविभागाकडे करण्यात आली होती. वनविभागाने या दृष्टिकोनातून पुढील पावले देखील उचलली होती. बिबट्याचा शोध सुरू असतानाच मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिक - पुणे महामार्गावरील बायपास रस्त्यावर मनेगाव शिवारात भोजने फार्मजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणारा बिबट्या ठार झाल्याची घटना घडली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. वनविभागाचे कर्मचारी तातडीने या बिबट्याचे शव ताब्यात घेतले असून पंचनाम्यासाठी तसेच पुढील कारवाईसाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
महाराष्ट्रताज्या घडामोडी
October 5, 2025 07:42 AM
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर
महाराष्ट्र
October 4, 2025 08:45 PM
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही
महाराष्ट्रताज्या घडामोडी
October 4, 2025 11:37 AM
अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द
महाराष्ट्रताज्या घडामोडी
October 4, 2025 10:09 AM
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर
राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका
महाराष्ट्रमहत्वाची बातमी
October 4, 2025 07:25 AM
पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय
महाराष्ट्रविडिओ
October 3, 2025 09:15 PM
दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या