राजापूर :एकीकडे राज्यात ओमायक्रॉन रूग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झालेली असताना राजापूर तालुकावासीयांसाठी दिलासादायक वातावरण आहे. तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पुन्हा एकदा शून्यावर आल्याने राजापूर तालुका आता पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आता राजापूर तालुकावासीयांना दिलासा मिळाला असून भविष्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाही वा ओमायक्रॉनचा फैलाव होणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारीही वाढली आहे.
यापूर्वी पहिल्या लाटेत दोन वेळा आणि त्यानंतर दुसऱ्या लाटेतही एक वेळा राजापूर तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा शून्यावर येऊन तालुका कोरोनामुक्त झाला होता. मात्र पुन्हा रुग्ण संख्या वाढल्याने हा आकडा वाढला होता. मात्र दुसऱ्या लाटेत पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तालुक्यातील ओणी, रायपाटण येथील कोविड रुग्णालये व धारतळे, हातिवले व रायपाटण येथील कोविड केअर सेंटरही बंद करण्यात आलेले आहेत.
गेल्या आठवडाभरात तालुक्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळून आलेला नाही. जो एक कोरोनाबाधित रूग्ण होता व ज्याच्यावर उपचार सुरू होते, तो शनिवारी पूर्णपणे बरा झाल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता शून्य झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि जनतेला देखील दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात आजपर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकूण ५ हजार १८८ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. यातील ४ हजार ९८४ रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजपर्यंत तालुक्यात २०४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या एकही रूग्ण तालुक्यात अॅक्टीव्ह नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या शून्य इतकी आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…