मुंबई : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नयेत अशी सरकारची भूमिका आहे. यासंदर्भात आज विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत या संदर्भातला प्रस्ताव आज विधानसभेत मांडला जाणार आहे.
ओबीसी आरक्षणावरून मध्य प्रदेशात निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर आता राज्यातही निवणुकांसाठी तोच पॅटर्न राबवला राबवला जाण्याची शक्यता दिसतेय. त्यासाठी आज विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होतेय. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत पुढचे किमान सहा महिने निवडणुका पुढे ढकलाव्यात असा प्रस्ताव आज विधानसभेत मांडला जाणार आहे. ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.
निवडणुका 4 ते 6 महिने पुढे ढकलल्या जाव्यात – विजय वडेट्टीवार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 ते 6 महिने पुढे ढकलल्या जाव्यात ही आमची भूमिका आहे, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. निवडणुका पुढे ढकलल्यानंतर तरतुदींनुसार प्रशासक नेमला जाणार आहे. मध्य प्रदेश सरकारनं ठराव करुन निवडणुका पुढे ढकलण्याची शिफारस केली. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका 4 ते 6 महिना पुढे ढकलल्या जाव्या असा ठराव आज महाविकास आघाडी करते आहे.
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…