मुंबई : सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे आणि अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत 35 जणांचा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून 2 हजार 300 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 35 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
विधानसभा अध्यक्षांपदाच्या शर्यतीत असलेले के. सी. पाडवी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 2 दिवसांत एकूण 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 2 दिवसांत 2 हजार 300 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, 3 पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
के. सी. पाडवी अधिवेशासाठी उपस्थित होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. आज बीएमसी कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन पुन्हा त्यांची कोरोना चाचणी करणार आहेत. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळत आहे. याव्यतिरिक्त भाजप आमदार समीर मेघे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वीही अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ज्यावेळी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या होत्या 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…