अनिल परब - नितेश राणे यांच्यात बाचाबाची

मुंबई, : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बेजार झालेले परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे सदस्य नितेश राणे यांनी एका प्रकरणात अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आग्रह धरल्यामुळे त्यांच्यात तसेच राणे यांच्यात आज विधानसभेत जोरदार बाचाबाची झाली. 

भाजपाचे सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी एसटीमधल्या एका अपहार व अनियमिततेच्या एका तारांकित प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. त्यावर भाजपाचे सदस्य आक्रमक झाले. त्यावेळी नितेश राणे यांनी या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली. त्यावेळी परिवहन मंत्री राणे यांना त्यांच्या स्थानावर बसण्याचा आग्रह धरू लागले. त्यामुळे या दोघांमध्ये जोरदार बाचाबाचीही झाली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला जागा देण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत. त्यात कोणत्या सदस्याला कोणते आसन द्यायचे हे ठरविण्याचा अधिकार आमचा आहे, असे सांगत राणे यांच्या आसनाचे समर्थन केले. तितक्यात उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पुढचा प्रश्न विचारला व पुढे बाचाबाची थांबली. एस.टी. महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना वेळेवर निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्यासाठी महामंडळ सकारात्मक असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मेघना साकोरे बोर्डीकर, राजेश पाटील यांच्या एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
Comments
Add Comment

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१