राणी बागेतील त्या फलकाबाबत पालिकेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील सगळ्यांचेच आकर्षण असलेल्या राणी बागेचे नाव हजरत हाजी पीर बाबा राणीबाग असे करण्यात आले असल्याच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अफवेबाबत पालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


राणीबागेत गेले कित्येक दशके असलेल्या दर्ग्याच्या नावाचा फलक नवा लावण्यात आला असून, त्यावरून राणीबागेचे नाव बदलल्याची सोशल मीडियावर अफवा पसरवली होती. यावरून राणीबागेचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय असेच आहे, असे प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे, तर इंग्लंडच्या राणीसाठी मुंबईच्या भायखळा येथे खास उद्यान बनवण्यात आले. त्यात प्राण, पक्षी आणि विविध प्रकारची झाडे आहेत.


सदर उद्यान १८६१ साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळात तयार झाले. इंग्लंडच्या राणीसाठी हे उद्यान बनवले असल्याने या उद्यानाचे नाव ‘व्हिक्टोरिया गार्डन’ असे होते, त्याला मराठीमध्ये ‘राणीची बाग’ असे म्हणत. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात या उद्यानाचे नामांतर ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय’ असे करण्यात आले.


याच राणीबागेत गेले कित्येक दशके ‘हजरत हाजी पीर बाबा’ यांचा दर्गा आहे. ‘हजरत हाजी पीर बाबा’ राणी बागवाले म्हणून त्याची ओळख आहे. राणी बाग आंतरराष्ट्रीय पद्धतीची बनवली जात आहे. राणीबागेचे सुशोभीकरण केले जात असून याचाच एक भाग म्हणून दर्ग्याचा नामफलक नव्याने लावण्यात आला आहे.



उद्यानाचे नाव राणी बाग नाही - डॉ. संजय त्रिपाठी, संचालक प्राणिसंग्रहालय


उद्यानाचे नाव राणी बाग नसून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय असे आहे. पूर्वीच्या काळापासून लोक उद्यानास राणीबाग म्हणून संबोधत आले आहेत. तसेच जिजामाता उद्यानातील जुन्या दर्ग्याचे नाव ‘हजरत हाजी पीर बाबा ’ असे आहे.
डॉ. संजय त्रिपाठी, संचालक प्राणिसंग्रहालय

Comments
Add Comment

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा

मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपचे आंदोलन

निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा 'मविआ' चा कट उधळून लावा – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई: आगामी

वेध निवडणुकीचा : कलिना आणि वांद्रे पूर्व भाजपसाठी अनुकूल; २० ते २२ नगरसेवक निवडून येतील

उत्तर मध्य भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास सचिन धानजी मुंबई : मुंबई उत्तर मध्य

मुंबईत राजकीय रणकंदन पेटले! विरोधकांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला भाजपचे 'मूक आंदोलन' करत जशास तसे प्रत्युत्तर

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत, आज (दि. १) मुंबईत महाविकास