दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाने आज जाहीर केले. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. त्यानंतर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.


चार मार्च ते सात एप्रिल २०२२ या कालावधीत बारावीची तर १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा होणार असल्याचे त्यांनी याआधी सांगितले होते. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावर होणार आहेत. कोरोनामुळे अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे.


कोरोनाच्या निर्बंधांचे आणि प्रोटोकॉलचे पालन करूनच सर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य राहणार असून आवश्यक त्या सूचना शाळा आणि मुख्याध्यापक, शिक्षक यांना देण्यात आल्या असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले.


तसेच निकालाबाबतही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. बारावीचा निकाल हा जुनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर दहावीचा निकाल हा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे त्या म्हणाल्या.

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक


15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)


16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा


19 मार्च : इंग्रजी


21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)


22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)


24 मार्च : गणित भाग - 1


26 मार्च : गणित भाग 2


28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1


30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2


1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1


4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2

Comments
Add Comment

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई:

'आवडेल तेथे प्रवास', दिवाळीसाठी एसटीची आकर्षक योजना, कमी खर्चात प्रवासाची सुवर्णसंधी

मुंबई : अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्यास विरोध

मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी

कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून विठुरायाचे २४ तास दर्शन

सोलापूर : कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 'गोकुळ'चा नवा रेकॉर्ड, तब्बल इतके लाख दुधाची विक्री

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा